शनिवार, १२ एप्रिल, २०१४

अल्कोहोलिक्स अनोनिमस च्या १२ पायऱ्या !

व्यसनमुक्ती , श्रद्धा , आत्मपरीक्षण , चारित्र्य उभारणी , पापविमोचन आणि अध्यात्मिक जागृतीतून मोक्षाकडे नेणाऱ्या अल्कोहोलिक्स अनोनिमस च्या १२ पायऱ्या !

केवळ व्यसनमुक्तीच नाही तर व्यक्तिमत्वातील संपूर्ण बदलाकडे लक्ष देऊन सभासदांसाठी व्यक्तिगत आचरणाच्या १२ पायऱ्या अल्कोहोलिक्स अनोनीमस ने तयार केल्या आहेत ज्यांचे प्रामाणिक पणे आचरण केले तर व्यसनी व्यक्ती नेहमी करिता व्यसनमुक्त राहू शकतो इतकेच 

नव्हे तर जीवनातील सर्व अडचणींना तोंड देत प्रसन्नतेने राहू शकतो .

१) आम्ही मान्य केले की मद्यशक्ती पुढे किवां आमच्या व्यासनांपुढे..आम्ही हतबल आहोत ..शक्तिहीन झालो आहोत आणि आमचे जीवन अस्ताव्यस्त झाले आहे .

२ ) आम्ही या विश्वासाप्रात पोचलो की आमच्याहून महान असणारी शक्तीच आम्हास सुरळीत जीवन जगण्यास मदत करू शकते .

३) आमची इच्छा व आमचे जीवन आम्ही , आम्हास उमगलेल्या , समजलेल्या , कळलेल्या परमेश्वराच्या हाती सोपविण्याचा आम्ही निर्णय घेतला .

४) आम्ही काटेकोरपणे आणि निर्भयपणे आमच्या गत आयुष्यातील गुणदोषांची नोंद केली. ( आत्मपरीक्षण )

५) आम्ही परमेश्वरापाशी , स्वतःशी , आणि दुसऱ्या आदरणीय व्यक्तीपाशी गतआयुष्यातील बारीकसारीक चुकांची कबुली दिली .

६) परमेश्वराने आमच्यातील स्वभावदोष दूर करावेत यासाठी आम्ही संपूर्णपणे तयार झालो .

७) नम्रतापूर्वक आम्ही परमेश्वराला आळवले की त्याने आमच्यातील बारीक सारीक दोष दूर करावेत

८) ज्या सर्वाना आमच्यापासून त्रास झाला आहे अश्या लोकांची यादी तयार केली व त्यांची क्षमा मागून त्यांचे नुकसान भरपाई करण्याची तयारी केली .

९) प्रत्यक्षपणे अश्या सर्वांची क्षमा मागितली व नुकसान भरपाई केली व ज्यांची प्रत्यक्षपणे क्षमा मागितल्याने त्यांना व इतरांना अधिक त्रास होईल अश्यांना मात्र वगळले .

१०) नियमितपणे स्वतच्या वागणुकीचे निरीक्षण करू लागलो व स्वतःची चूक लक्षात येताच ताबडतोब कबुली दिली .

११ ) प्रार्थना व ध्यान यांच्या साह्याने आम्ही परमेश्वराशी जवळीक वाढवू लागलो व त्याची आमच्यासाठी इच्छा काय आहे त्यासाठीच प्रार्थना करून ती इच्छा पालन करण्याची शक्ती मागू लागलो .

१२ ) या तत्वांच्या आचरणाने आमच्यामध्ये आध्यात्मिक जागृती निर्माण झाल्यावर हा मार्ग आम्ही दुसऱ्या मद्य पिडीताना सांगू लागलो व स्वतः दैनंदिन व्यवहारात या सर्व तत्वांचे पालन करू लागलो .

प्रथम दर्शनी या सर्व तत्वांचा खोल अर्थ समजणे जरा कठीणच आहे . मी यातील प्रत्येक पायरीवर सविस्तर लिहिणारच आहे . मात्र हे नक्की ...हे सगळे अलौकिक आहे .. केवळ व्यसनी व्यक्तींनाच नाही तर स्वतच्या जीवनात निराश आणि वैफल्यग्रस्त असणाऱ्या ..जीवनाला कंटाळलेल्या ..अवस्थ ..असमाधानी असणाऱ्या ...सर्वांनाच या अध्यात्मिक सूचनांचा वापर करून आपले जिवन स्वतःसाठी तसेच इतरांसाठी अधिक अधिक उपयुक्त बनवता येईल !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा