रविवार, ३१ ऑगस्ट, २०१४

बियरची बला !



जास्तीत जास्त तरुणांनी बियर पिऊन ' झिंग ' अनुभवावी व सरकारला भरपूर महसूल मिळवून द्यावा म्हणून हल्ली सगळीकडे ' बियर शॉपी ' सुरु झाली आहे ..नुकतेच एका तरुणांच्या टोळक्याला हातात बियरचे टीन घेवून भरधाव वेगाने मोटारसायकल चालवताना पहिले ..जेमतेम १५ ते १८ या वयोगटातील त्या टोळक्यात मुलीही होत्या ...

१ ) बियरने काही होत नाही ..बियर म्हणजे दारू नव्हे ..हा एक मोठ्ठा गैरसमज सध्या अनेक लोकांच्या मनात असल्याचे लक्षात येतेय ..अर्थात कोण्यातरी बियरबाज व्यक्तींनीच हा गैरसमज पसरविला आहे ..बियर मध्ये अल्कोहोल असते ..फक्त तुलनेत कमी प्रमाणात असते ..बहुतेक दारूड्यांची व्यसनी होण्याची सुरवात बियरनेच झाली आहे हे सत्य आहे .

२) बियर पिणे हे उगाचच सधनतेचे किवा अधिक पुढारलेले असल्याचे लक्षण आहे हा एक दुसरा गैरसमज लोकांमध्ये पसरतो आहे.. त्यामुळे बियर पिणे हे जास्त सोफीस्टीकेटेड असल्याचे मानणारे अनेक महाभाग मला माहित आहेत ..हे महाभाग सर्रास घरी बियर घेवून येतात ..घरातल्या महिलांना देखील बियर ने काही होत नाही हे पटवून देत ..त्यांना देखील बियर घेण्यास भाग पाडतात .

३ ) उन्हाळ्यात बियर घेणे आरोग्यास चांगले असते असा देखील प्रसार झालेला असून ..अनेक जण उन्हाळ्यात ' चिल्ड बियर ' घेणे हे ज्यूस किवा सरबत घेण्यासारखे मानतात ..

४ ) सरकारशी साटेलोटे असलेल्या दारू उत्पादकांनीच बियर विक्रीचे लायसन मिळणे सहज सोपे करून ..जास्तीत जास्त बियर खपावी याची पुरेपूर दक्षता घेतली आहे .

५ ) एकदा का तुम्ही या बियर ची ' झिंग ' अनुभवलीत की मग दारू आणि इतर मादक पदार्थांच्या आहारी जाणे सोपे असते ...

Santosh Saraf -यांनी माहिती दिलीय ----अजून एक भयानक गैरसमज आहे की बियर प्यायल्याने मुतखडा निघून जातो म्हणून.
याविरुद्ध सत्य परिस्थिती अशी आहे की बियर प्यायल्याने मुतखडा होण्याचा अधिक संभव असतो. याला जबाबदार असतो तो बियर मधला ओक्झालेट. या ओक्झालेट मुळे किडनीमध्ये भरपूर घनता असलेले आणि तीक्ष्ण टोके असलेले कॅल्शियम ओक्झालेट चे स्फटिक तयार होतात. त्यांचे पुढे खडे बनून मनुष्याला भयंकर वेदना देतात. प्रसंगी किडनी खराब होऊन रुग्ण दगावू शकतो.
किडनी स्टोन होणार्या लोकांनी तर बियर अजिबात पिऊ नये.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा